Back

ⓘ फुटबॉल                                               

ऊर्जानगर

उर्जनगर ही महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड द्वारे संचालित चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन मधील कर्मचार्‍यांसाठी निवासी वसाहत आहे. हि वसाहत चंद्रपूरपासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे.

                                               

सत्तरी

                                               

गुरप्रीतसिंग संधू

गुरप्रीतसिंग संधू हा भारतीय फुटबॉल खेळाडू आहे. तो इंडियन सुपर लीग क्लब बेंगलोरतर्फे खेळतो. याशिवाय तो भारत राष्ट्रीय फुटबॉल संघाचा गोलकीपर आहे.

                                               

गाय केर

गाय केर हा माजी स्कॉटिश फुटबॉलपटू आहे. तो इनव्हर्नेस कॅलेडोनियन थिस्सल, एल्गिन सिटी, ईस्ट फिफ आणि बर्विक रेंजर्स या संघांकडून खेळला होता. आपल्या कारकिर्दीतील बहुतेक काळात तो स्ट्रायकर म्हणून खेळला, पण नंतरच्या कारकिर्दीत त्याने डिफेन्डर म्हणून खेळायला सुरुवात केली.

                                               

राजू गायकवाड

राजू एकनाथ गायकवाड हा भारतीय फुटबॉलपटू आहे जो इंडियन सुपर लीगमध्ये चेन्नईन एफसीचा बचावपटू म्हणून खेळतो. गायकवाड हे प्रामुख्याने सेंटर बॅक म्हणून खेळतात, परंतु पूर्ण बॅक म्हणूनही खेळू शकतात आणि लाँग थ्रो तज्ञ आहेत.

                                               

संदेश गुल्हाने

संदेश गुल्हाने हे एक डॉक्टर आणि स्कॉटिश कन्झर्व्हेटिव्ह पक्षातील राजकारणी आहेत. मे २०२१ पासून ग्लासगो प्रांतातील स्कॉटिश संसदेचे सदस्य आहेत. स्कॉटिश संसदेवर निवडून गेलेले हे भारतीय वंशाचे पहिले पुरुष आहे.

फुटबॉल
                                     

ⓘ फुटबॉल

फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात ११ खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू तो संघ विजेता ठरतो.

१९०४ रोजी पॅरिस येथे फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅंडहाॅलंड, डेन्मार्क, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांनी फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन फिफा ही संघटना स्थापन केली. इ.स. १८६३ साली फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबद्ध केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फिफासंघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा फुटबॉल विश्वचषक ही होय.

१९६२ च्या जागतिक चषक स्पर्धेत चिली व इटली यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम बघणारे इंग्लिश पंच केन ॲस्टन हे रेड व यलो कार्डाचे जनक आहेत. त्यानंतर १९७०च्या जागतिक स्पर्धेत या कार्ड्‌सची सुरुवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण जगभरात याला मान्यता मिळाली. केवळ फुटबाॅलच नव्हे इतर अनेक खेळांमध्ये या रंगीत कार्डांचा वापर केला जातो. फुटबॉल म्हणजे पायचेंडू. पायाने खेळविला जाणारा, हवा भरलेला मोठा कातडी चेंडू. या सांघिक व मैदानी खेळाचे अनेक प्रकार आहे. त्यांपैकी दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे: 1 असोसिएशन फुटबॉल अथवा सॉकर आणि 2 रग्बी.

सॉकर हा प्रत्येकी अकरा खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये खेळला जातो. त्यात चेंडू हाताळणे वा तो हातात घेऊन पळत सुटणे नियमबाह्य मानले जाते. रग्बी वा रग्बी युनियन ह्या प्रकारात मात्र चेडू हाताळणे वा तो हातात घेऊन धावणे ग्राह्य मानतात. त्यातूनच रग्बी लीग हा वेगळा प्रकार १८९५ साली निर्माण झाला. रग्बी युनियन या प्रकारातून निर्माण झालेल्या अमेरिकन फुटबॉलमध्ये खूपच वेगळेपणा दिसून येतो. रग्बीमध्ये चेंडू पुढे पळवता येत नाही; या खेळात तो पुढेही नेता येतो. तसेच हा खेळ अधिक उग्र व आक्रमक असल्याने त्यात आडदांडपणा व धसमुसळेपणा जास्त आढळतो. कॅनडियन फुटबॉल हा अमेरिकन फुटबॉलशी साधर्म्य असलेला पण काही महत्त्वाचे फेरफार असलेला प्रकार आहे. आयर्लंडमध्ये खेळला जाणारा गेलिक फुटबॉल हाही एक आडदांड प्रकार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणारा ऑस्ट्रेलियन फुटबॉल हा जुन्या गेलिक फुटबॉलचे काही नियम आत्मसात केलेला तथापि वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. या सर्व प्रकारांची माहिती नोंदीत पुढे दिली आहे. यांपैकी सॉकर हा खेळ जास्त लोकप्रिय असून तो जगातील बहुतेक देशांतून खेळला जातो. भारतात ब्रिटिशांच्या बरोबर आलेला फुटबॉल म्हणजे सॉकरच होय., फुटबॉल मध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे.by Shreyash

                                     

1. महत्त्वाच्या संघटना

 • युएफा: युनिअन युरोपिअन दे फूटबॉल असोसिएशन
 • ए.एफ.सी: असिअन फुटबॉल कॉन्फेडरेशन
 • कोन्काकाफ: द कॉन्फेडरेशन ऑफ नॉर्थ,सेंट्रल अमेरिका आणि कॅरिबिअन फुटबॉल
 • फिफा: फेदेरात्सिओन इंटरनात्सिओनाल दे फुटबॉल आसोसिआत्सिओन
 • सी. ए. एफ: कॉन्फेडरेशन आफ्रिकान डे फुटबॉल
                                     

2. राष्ट्रांतर्गत/आंतरराष्ट्रीय क्लब स्पर्धा

 • स्पॅनिश ला लीगा
 • इंग्लिश प्रीमियर लीग
 • लीग वन1 - फ्रान्स
 • इटालियन सेरी आ
 • आय लीग - भारत
 • एफ.ए. कप
 • बुन्डेसलीगा - जर्मनी
 • यु.ए.फा. कप
 • यु.ए.फा. चॅंपियन्स लीग
                                     

3. बाह्य दुवे

 • फिफा - अधिकृत संकेतस्थळ

  • इंग्लिश मजकूर
                                               

आर्नी साइडबॉटम

आर्नोल्ड आर्नी साइडबॉटम हा इंग्लंडकडून १९८५ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा मँचेस्टर युनायटेडकडून क्लब फुटबॉल सुद्धा खेळला.

                                               

केल्विन अभिषेक

२०१८-१९ मध्ये अभिषेकने नवीन आय-लीग २ प्रभाग क्लब, एआरए एफ.सी. त्याने १६ जानेवारी २०१९ रोजी हिंदुस्तान एफसी विरुद्ध व्यावसायिक पदार्पण केले

                                               

जय पिग्गीन

२०११ मध्ये जेने आपल्या महाविद्यालयीन संघासाठी खेळलेल्या खेळाच्या खेळाडू म्हणून कारकीर्द सुरू केली. २०१५ मध्ये त्याने बॉडीबिल्डिंगमध्ये प्रवेश केला जेथे २०१६ मध्ये त्याने गॅस्ट्रो फिटनेस पुरस्कार आणि २०१७ मध्ये आयएफबीबी पुरुष प्रो लीग पुरस्कार जिंकला.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →