Back

ⓘ महाराष्ट्रातील पर्यटन                                               

गगनबावडा

गगनबावडा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्याचे मुख्य गाव आहे. प्राचीन काळापासून वाहतूक व दळणवळणासाठी घाटांना अतिशय महत्त्व आहे. इतिहासकाळीच या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी व गरजेच्या वेळी तो घाटमार्ग रोखून धरण्यासाठी जागोजागी किल्ले बांधले गेले. कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या पश्चिमेच्या टोकावर गगनगडाची निर्मिती याच कारणातून करण्यात आली. सह्य़ाद्रीच्या धारेतून पुढे आलेल्या एका डोंगरावर हा गगनगड वसला आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची आहे ६९१ मीटर. गगनबावडा हे गडाच्या पायथ्याचे गाव. कोल्हापूरपासून हे अंतर आहे ५५ किलोमीटर. हे गाव तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे पडणाऱ्या तुफान पाव ...

महाराष्ट्रातील पर्यटन
                                     

ⓘ महाराष्ट्रातील पर्यटन

महाराष्ट्र राज्यात दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी आणि परदेशांतून सुमारे २० लाख पर्यटक येतात. त्यापैकी दीड कोटी पर्यटक हे अजिंठा,वेरूळ व मुंबईला भेट देतात. परदेशी पर्यटकांपैकी तीन ते साडेतीन लाख पर्यटक राज्याच्या इतर भागांना जसे पंढरपूर,शिर्डी,पैठण, शनि शिंगणापूर आदी ठिकाणी भेटी देतात. हे पर्यटक मुख्यत्वे ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी आणि व्यावसायिक कारणाने महाराष्ट्रातील शहरांना भेटी देतात. परदेशी पर्यटकांत १९९०पासून शैक्षणिक कारणासाठी आणि २००० पासून वैद्यकीय उपचारांसाठी येणारांचे प्रमाण वाढीस लागले.

देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक कारणाने होणाऱ्या पर्यटनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

                                     

1. महाराष्ट्रातील पर्यटनाचा इतिहास माहिती

महाराष्ट्र राज्य ऐतिहासिक परंपरेने पूर्णतः सुसज्ज आहे. महाराष्ट्राला सातवाहन, वाकाटक, चालुक्य, मराठे, पेशवे इत्यादींचा महत्त्वाचा आहे. सातवाहनांच्या काळातील कैलास लेणी, शिव मंदिरे; मराठ्यांच्या काळातील गडकिल्ले दुर्ग विशेषतः त्यांतील जलदुर्ग,की जे महाराष्ट्राशिवाय इतर कोठेही सापडत नाहीत.तर पेशवा काळात तयार झालेले भुईकोट किल्ले इत्यादींनी महाराष्ट्र राज्याला पर्यटनाच्या इतिहासात समृद्ध केले.

                                     

2. पायाभूत सुविधांचा अभाव आणि अडचणी

१९९० नंतर दळणवळण आणि रस्ते विकासाला महाराष्ट्रात चालना मिळाली. पर्यटकांसाठी खाजगी वाहतूक कंपन्या पुढे आल्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेतही सुधारणा झाली, बीओटी बांधा-चालवा- हस्तांतरित करा तत्त्वावर रस्ते सुधारण्याचेही काम झाले; तरी सुद्धा प्रत्यक्ष पर्यटनास निघालेल्या व्यक्तीस स्वच्छ, सुयोग्य दरात दर्जेदार सेवा देतील अशा हॉटेल्सचा अभाव, नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठीचा सर्वसाधारण अनाग्रह, परभाषक आणि परदेशी पर्यटकांशी केली जाणारी गैरवर्तणूक आणि सभ्य नागरिकांची या विषयीची उदासीनता, आत्यंतिक लोकसंख्येमुळे पर्यटन स्थळांचे गर्दीच्या ठिकाणांत झालेले रूपांतर इत्यादी बाबी, महाराष्ट्रात निव्वळ पर्यटन उद्देशाने येणाऱ्या परकीय पर्यटकांच्या दृष्टीने गोवा, केरळ, राजस्थान या इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत नकारात्मक ठरतात.

ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टीने दिवाबत्तीची सोय, पिण्याचे पाणी, डास आणि उंदरांचे निराकरण, सार्वजनिक ठिकाणची वैयक्ति स्वच्छतेच्या अल्पसुविधा, एकूण अस्वच्छता, प्रवासी बसेसची स्थानकांवरील आणि रेल्वे स्टेशनवरील अस्वच्छता, कुत्री, डुकरे आणि जनावरांचा अयोग्य पद्धतीने वावर, राहाण्याच्या जागेची अस्वच्छता, उपाहारगृहांतील अनारोग्यकारक पदार्थ आणि वातावरण, सेवादात्यांमध्ये व्यावसायिकतेचा, संवाद कौशल्याचा आणि सौजन्याचा अभाव इत्यादी अडचणी आढळून येतात. पाश्चिमात्य पोशाखपद्धतीबद्दल बाळगलेला कुत्सित नकारात्मक दृष्टिकोणही क्वचित दिसतो.

==महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे==fdsdzfff

==व्यावसायिक आणि व्यापारउदीम==तुजारपूर दुध व्यवसाय साठी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख ठिकाण हे सांगली जिल्ह्य़ातील इस्लामपूर पासून 8 km अंतरावर आहे

                                     

3. थंड हवेची आणि पावसाळी ठिकाणे

मुंबईपासूनची अंतरे:

 • तोरणमाळ - धुळ्यापासून ४० किमी
 • म्हैसमाळ - औरंगाबादहून ४० किमी
 • माथेरान - १११ किमी
 • जव्हार - १८० किमी
 • चिखलदरा - ७६३ किमी
 • खंडाळा - १०० किमी
 • महाबळेश्वर - २५६ किमी
 • लोणावळा - १०४ किमी
 • आंबोली - ५४९ किमी
 • पुणे - १७० किमी
 • कास सातारा
 • भंडारदरा - १८५ किमी
 • पाचगणी-
 • पन्हाळा - ४२८ किमी
                                     

4. अभयारण्ये

 • मालवण -
 • माळढोक - अहमदनगर, सोलापूर
 • पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
 • यावल - जळगांव
 • चापराला - गडचिरोली
 • फणसाड - रायगड
 • कोयना - सातारा
 • बोरीवलीसंजय गांधी - मुंबई
 • औट्रमघाट - जळगांव
 • मुळा-मुठा - पुणे
 • चांदोली - सांगली, कोल्हापूर
 • तानसा - ठाणे
 • राधानगरी - कोल्हापूर
 • अंधेरी - चंद्रपूर
 • माहीम - मुंबई
 • किनवट - यवतमाळ
 • अनेर - धुळे
 • संजय गांधी - मुंबई
 • बोर - वर्धा
 • नांदूर मध्यमेश्वर - चंद्रपूर
 • काटेपूर्णा -
 • भिमाशंकर - पुणे, ठाणे
 • मेळघाट - अमरावती
 • सागरेश्वर - सांगली
 • मधमेश्वर - चंद्रपूर
 • कोळकाज - अमरावती
 • कळसूबाई - अहमदनगर
 • जायकवाडी -
 • नानज - सोलापूर
 • देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
 • पेंच - नागपूर
 • रेहेकुरी - अहमदनगर
 • नवेगांव - भंडारा
 • कर्नाळा - रायगड
 • ढाकणा कोळकाज - अमरावती
 • गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
 • ताडोबा - चंद्रपूर
 • नागझिरा - भंडारा
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →