Back

ⓘ मदुराई                                               

पारलिंगी व्यक्तींसाठी राष्ट्रीय परिषद

पारलिंगी व्यक्तींसाठी राष्ट्रीय परिषद हे भारत सरकारचे एक वैधानिक मंडळ, पारलिंगी, मध्यलिंगी व्यक्ती आणि विविध लिंग ओळख / अभिव्यक्ती आणि लैंगिक वैशिष्ट्ये ओळख लोकांसंबंधित साधारणपणे सर्व धोरणांबाबतीत सरकारला सल्ला देण्याचे काम करते. या परिषदेची स्थापना२०२० मध्ये पारलिंगी व्यक्ती अधिनियम, २०१९ च्या तरतुदीखाली करण्यात आली. ऑक्टोबर २०२० पर्यंत या परिषदेचे नेतृत्व सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत करीत होते. ही परिषद उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम and ईशान्य क्षेत्रातील पारलिंगी समुदायाचे चार प्रतिनिधी आणि मध्यलिंगी समुदायाच्या एका प्रतिनिधी ने बनली आहे. याव् ...

मदुराई
                                     

ⓘ मदुराई

मदुराई मराठीत मदुरा Madura, किंवा स्थानिक भाषेत मदुरै-मदुराई किंवा अनेकदा कूडल कूडलनगर ह्या नावाने प्रसिद्ध असणारे शहर. भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे, तसेच मदुरा हे भारतीय उपखंडातील सर्वात जुने मानववस्ती असलेले ऐतिहासिक नगर म्हणून देखील ओळखले जाते. हे शहर मदुराई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून तमिळनाडूतील ते तिसरे मोठे शहर आहे. या शहरास सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे.

मदुरा हे वैगई ह्या नदीच्या काठी वसले आहे. मदुरेला देवळांचे महानगर किंवा कूडल मानगर असे संबोधले जाते. तसेच ते तमिळनाडू राज्याची सांस्कृतिक राजधानी कलाच्चार तलैनगर म्हणूनही प्रसिद्ध आहे. या शहराला मोगर्‍याचे नगर, तुंग मानगर जागृत महानगर, पूर्वेकडील अथेन्स Athens of the East अशा नावांनीही ओळखले जाते.

                                     

1. भाषा तमिळमध्ये मोळी

मदुरा शहरात प्रामुख्याने तमिळ भाषा बोलली जाते. या तमिळ बोलीला विशेष महत्त्व आहे. इथली तमिळ ही कोंग तमिळ, नेल्लै तमिळ, रामनाड तमिळ आणि चेन्नै तमिळ ह्या बोलींपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथल्या तमिळ बोलीला तमिळनाडू राज्यात प्रमाण मानण्यात आले आहे. शहरात तमिळ सोबतच इंग्लिश भाषा, तेलुगू, गुजराती व उर्दुू या भाषा काही प्रमाणात बोलल्या जातात. परंतु सर्वच भाषांवर तमिळचा प्रभाव दिसुून येतो.

                                     

2. स्थापत्य व प्रमुख धार्मिक स्थळे

  • मीनाट्चीअम्मन कोविल/कोईल मीनाक्षी मंदिर

भगवान शंकरसुंदरेश्वर व पार्वती मीनाक्षी यांचे हे एक सुरेख असे धार्मिक स्थळ असून ते मीनाक्षी देवीच्या नावाने ओळखले जाते. मदुरा नगराची बांधणी ही प्रामुख्याने मीनाक्षी मंदिराच्या आजूबाजूने झाली आहे. एके काळी संपूर्ण नगराच्या मध्यस्थानी मीनाक्षी-सुंदरेश्वराचे देऊळ दिसत असे. हे मंदिर गोपुरम शैलीतील असून मंदिराला एकूण १४ गोपुरे आहेत. स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेले हे देऊळ देशातील देवीच्या प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे. हे १६व्या शतकातील बांधकाम असून, त्याचे क्षेत्रफळ ६५ हजार चौरस मीटर इतके आहे. हजार खांबाचा मंडप हे इथल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. मंदिरातील विशेष कोरीवकाम मुख्य मंदिर तसेच सहस्त्रस्तंभ नटराज सभा व चित्रकला हे खास आकर्षण आहे.

  • कूडल अळगर कोविल/अळगराचे देऊळ)

मदुरा नगराच्या केंद्रस्थानी असणारे हे भगवान विष्णूंचे एक अतिशय सुंदर देऊळ आहे. इथे विष्णू "अळगर"अर्थ:सुंदरसा ह्या नावाने ओळखले जातात. सुबक सुंदर कोरीवकाम, उत्सवाचा हत्ती आणि मरकतवल्ली लक्ष्मी स्थान हे अतिशय प्रेक्षणीय आहेत्. हे विष्णूच्या १०८ दिव्यदेशम् अशा पवित्र स्थानांपैकी एक आहे. हे देऊळदेखील अतिशय प्राचीन असून हजारो भक्तगणांची येथे नेहमीच दाटी असते.

  • गांधी संग्रहालय, मदुरै
  • तिरुप्परनकुंड्रम
  • वंदियुर मरिअम्मन तेप्पाकुळम मरीआईचे कुंड
  • अदिसयम वॉटर पार्क
  • तिरुमलै नायगन पॅलेस नायक महाल
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →